Ration card big update:देशभरातील गरजूंसाठी दिलासा असलेल्या मोफत रेशन योजनेत महत्त्वाचे बदल होत आहेत. कोरोना काळापासून अनेकांना मोफत अन्नधान्याचे वाटप केले जात आहे, पण काही लोक या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे.
शासनाने अशा गैरफायदेखोरांवर कठोर पावले उचलली आहेत. जे लोक रेशन कार्डसाठी अपात्र असतानाही या योजनेचा फायदा घेत आहेत, त्यांची रेशन कार्डे आता कायमस्वरूपी रद्द केली जाणार आहेत.
आज पुन्हा सोन्याचा भाव आपटला; पहा 10 ग्राम सोन्याचा ताजा भाव !
शासनाच्या नियमानुसार, ज्यांच्याकडे 100 चौरस मीटरचा प्लॉट, फ्लॅट किंवा दुकान आहे, चारचाकी वाहन, ट्रॅक्टर आहे, तसेच ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे, अशांना रेशनचा लाभ मिळणार नाही. याशिवाय, ग्रामीण भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा अधिक आणि शहरी भागातील कुटुंबाचे उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त असल्यास, त्यांनाही रेशन दिले जाणार नाही.
जे नागरिक या निकषांची पूर्तता करत नाहीत, त्यांनी आपल्या रेशन कार्डाचे तहसील कार्यालयात सरेंडर करावे, असा आदेश देण्यात आला आहे. अन्यथा, त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार, तारीख ठरली ! जाणून घ्या संपूर्ण माहिती
जे अपात्र आहेत, त्यांच्याकडून अपात्र ठरलेल्या तारखेपासून रेशनची किंमत 29 रुपये प्रति किलो या दराने वसूल केली जाणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे गरजूंच्या अन्न सुरक्षा योजनेला अधिक संरक्षण मिळणार आहे, परंतु या नव्या नियमांमुळे काहींच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे या निर्णयाच्या संपूर्ण माहितीसाठी नागरिकांनी सखोल माहिती घेतली पाहिजे.
कोरोना काळात रेशन कार्डधारकांना मोफत रेशन देण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह ठरला होता. मात्र, योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभधारकांवर कारवाई होणार आहे, जेणेकरून योजनेचा खरा फायदा फक्त पात्र नागरिकांनाच मिळेल.