पुणे रिंगरोड: ऑक्टोबरपासून सुरू होणार काम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीला कमी करण्यासाठी रिंगरोड प्रकल्पाची सुरुवात रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. या कामाच्या फेरनिविदा परत राज्य सरकारकडे सादर केल्या असून, प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्यांचा प्रस्तावही शासनाकडे पाठवण्यात आला आहे. एकदा हा प्रस्ताव मंजूर झाला की, ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

पुणे रिंगरोडची एकूण लांबी 174 किलोमीटर असून, त्याची रुंदी 110 मीटर असेल. हा रस्ता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा देईल. 2017-18 वर्षातील तुलनेत सध्याच्या निविदा 16 ते 17 टक्क्यांनी जास्त दराच्या आढळल्या आहेत. काही कंपन्यांनी सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत दोन टक्क्यांनी जास्त दर, तर काहींनी दोन टक्क्यांनी कमी दराचे निविदा सादर केले आहेत.

रस्ते विकास महामंडळाकडून या निविदांच्या दरांबाबत कंपन्यांसोबत वाटाघाटी सुरू आहेत. यानंतर अंतिम सुधारित प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. विविध कंपन्यांकडून आलेल्या जादा दराच्या निविदा कमी केल्या आहेत.

हा रिंगरोड दोन विभागांमध्ये विभागला जाईल: पूर्व आणि पश्चिम. पूर्व भागातील मार्ग मावळ तालुक्यातील 11, खेड 12, हवेली 15, पुरंदर 5, आणि भोर 3 गावांतून जाईल. पश्चिम भागातील मार्ग भोर तालुक्यातील एक, हवेली 11, मुळशी 15, आणि मावळ मधील 6 गावांमधून पार होईल.

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp