pune news पुणे, ता. २३: दक्षिण भारतातून येणाऱ्या गाड्या उशिरा मुंबईला पोहोचल्यामुळे मुंबई स्थानकावरून सुटणाऱ्या अन्य गाड्यांच्या वेळापत्रकात अडचणी निर्माण होत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने पाच रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे.
वेळापत्रकातील बदल:
- पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस: ही गाडी आता पुण्याहून दुपारी ३:१५ वाजता निघण्याऐवजी ३:२७ वाजता सुटेल आणि मुंबईला संध्याकाळी ७:०५ वाजता न पोहोचता ७:१५ वाजता पोहोचेल. हा बदल २५ ऑगस्टपासून लागू होईल.
- नागरकोईल-मुंबई एक्स्प्रेस: ही गाडी पुण्याहून दुपारी ३:१५ वाजता निघण्याऐवजी ३:०० वाजता सुटेल आणि मुंबईला ७:०५ वाजता पोहोचेल. हा बदल २५ ऑगस्टपासून अमलात आणला जाईल.
- नागरकोईल-मुंबई एक्स्प्रेस (१६३४०): ही गाडी पुण्याहून दुपारी ३:१५ वाजता निघण्याऐवजी ३:०० वाजता सुटेल आणि मुंबईला ७:०५ वाजता पोहोचेल. हा बदल २६ ऑगस्टपासून लागू होईल.
- तिरुअनंतपुरम-मुंबई एक्स्प्रेस: पुण्याहून ही गाडी आता ३:१५ वाजता निघण्याऐवजी ३:०० वाजता सुटेल. मुंबईला ती ७:०५ वाजता पोहोचेल. हा बदल २४ ऑगस्टपासून प्रभावी होईल.
- दौंड-इंदूर एक्स्प्रेस: ही गाडी दौंड येथून आता दुपारी २:१० वाजता सुटेल, पूर्वी ती २:०० वाजता निघत असे. पुणे स्थानकावर मात्र कोणताही बदल केलेला नाही.