medicine ban list:केंद्र सरकारने 150 पेक्षा अधिक औषधांवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आजच जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, या औषधांची निर्मिती आणि विक्री करण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आले आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकारने विविध 150 पेक्षा अधिक औषधांवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. यामुळे ताप, अंगदुखी यासारख्या सामान्य समस्यांसाठी वापरली जाणारी औषधं आता उपलब्ध होणार नाहीत. सरकारच्या निर्णयानुसार, बंद केलेल्या औषधांची निर्मिती, विक्री आणि वाहतूक यावरही कडक बंदी असणार आहे.
औषधांवर बंदी – तत्काळ प्रभावाने
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून यासाठी एक सविस्तर अधिसूचना जारी केली आहे. हा निर्णय कॉस्मेटिक्स अॅक्ट 1940 च्या कलम ’26 अ’ अंतर्गत घेण्यात आला आहे. म्हणजेच, आता एकूण 150 पेक्षा अधिक औषधांची निर्मिती आणि विक्री तात्काळ बंद करावी लागणार आहे.
बंदी घातलेल्या औषधांमध्ये काय आहे?
सरकारने बंदी घातलेल्या औषधांमध्ये ताप, अंगदुखी आणि इतर सामान्य आजारांसाठी वापरले जाणारे औषधं समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ, एसिक्लोफेनॉक 50एमजी आणि पॅरासिटामोल 125एमजी असलेले औषध, मेफेनॅमिक अॅसिड आणि पॅरासिटामोल इंजेक्शन, सिट्राझीन एचसीएल, पॅरासिटामोल आणि फेनिलफ्रीन एचसीएल युक्त औषधांची विक्री आता करता येणार नाही.
पेनकिलरवरही बंदी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, पॅरासिटामोल, ट्रामाडोल, टॉरिन आणि कॅफीन यांचे संयोजन असलेले पेनकिलर औषधं देखील बंदीच्या फडात येतात. हे औषध अंगदुखीसाठी वापरले जात होते.
बंदीची कारणे
केंद्र सरकारने हानीकारक ठरणाऱ्या औषधांवर बंदी घालण्याचे धोरण घेतले आहे. चाचणीविना औषधांची निर्मिती किंवा योग्य प्रक्रियेचा पालन न केल्यास तात्काळ बंदी घातली जाते. या निर्णयावर तज्ज्ञ समिती आणि सल्लागार मंडळाने सल्ला दिला आहे. पूर्वीही, मार्च 2016 मध्ये 344 औषधांवर तसेच जून 2023 मध्ये 14 औषधांवर बंदी घालण्यात आली होती.